जावळींच्या रानात

“जावळीच्या रानांत….”

“आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न धरिता(करीता), कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणामध्ये परस्परे कलह लाऊन दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपणहून गेले, कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करवले, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले.”

______खुद्द शिवाजीराजे व मावळे चाळीसहजार घोऊन रात्री चालोन तिसरे रोजी श्रीमहाबळेश्वरावरुन निशाणीचा घाट उतरुन जाऊलीस गेले.रघुनाथ बल्लाळ सबनविस व माणकोजी दहातोंडे सरनौबत त्या समागमें फौज देऊन रडतोंडीच्या घाटें तिकडून ते आले.जाऊलीस वेढा घातला.दोन प्रहर पावेतो भांडण झाले.गांव घेतला.बाजीराऊ आणि कृष्णाराऊ राजे मोरे पंधरा सोळा वर्षाची उमर होते.त्यांस स्रीयांदेखील कैद केले.मत्ता द्रव्य बहुत पुरातन राज्यभंग केला.चंद्रराऊ मोरे घेऊन पुण्यास आले.

-९१ कलमी बखर

_____थोडा सरंजाम केला.त्यांणी(मोरेंनी) अमानुष कृती केली.तस्मात त्या जागेचा लाभकाळ आमचा आहे.त्या आर्थी कोणताही आंदेशा न देऊन सर्वांचे एकदिलाने पुरंदराहून श्रीमहाबळेश्वरी येऊन श्रीसांबसदाशिवाचे दर्शन घेतले.ध्यान करीते झाले.

ऐसे ध्यान करुन त्याच घाटांनी खांसा उतरले.रघुनाथ बल्लाळ आत्रे(कोरडे)ह्यांजबराबर पांच सांत हजार मावळे व पांच चारशे स्वार देऊन,रडतोंडीचे घाटांनी यावे असे संकेताने एकसमायावच्छदें उभय सैन्य जावळीस सुर्योदयापूर्वी येऊन लागली.

-श्रीशिवदिग्विजय

______शिवाजीराजांनी आपल्या सैन्यास रडतोंडीच्या (आश्रुमुखीच्या)घाटांवरुन जाण्यस सांगून आपण रात्री.शिवालयांत झोपले.सकाळी ससैन्यासहित निघाले.दुतांकडून शिवाजीराजे ससैन्य आगमन समजल्यावर चंद्ररावाचे सैन्य रडतोंडीच्या घाटाकडे गेले.

-शिवकाव्य

_____सांप्रत महाबळेश्वरच्या “एलफिंन्स्टन पॉईंट” या ठिकाणाहून शिवराय स्वत: चाळीस हजार सैन्य घेऊन खाली उतरले.या बाबतच्या या बखरीतील नोंदी आहे.आणखाही समकालीन साधनांत या नोंदी मिळतात.यात चाळीस हजार सैन्य या बाबत थोडीशी शंका वाटते.संख्या कमी जास्त असेलही…

पण,महाराज याच घाटाने खांसा उतरले हे नक्की.

आता म्हणाल तर काय घाट तर आहे कुणीही उतरेल.

नाही गडे हो…

जावळी म्हणचे जणू गरुडाची बसकण.वाघाची जाळी ती जावळी.अत्यंत घनदाट कड्या कपारी अन जंगलांनी भरलेला हा परिसर.जावळीस उतरण्यास आत्ता बरेच मार्ग आहेत.त्यावेळीहि आणखी असतील….

पण,या घाटाने उतरण्याची महाराजांची रणनिती वेगळी होती.

१६५६ सालाचा सुरुवातीचा कालखंड.जावळीचे “चंद्रराव” बिरुद धारण करणारे “मोरे” महाराजांच्याच कृपेने गादीवर बसले.महाराजांनाही वाटले.पुढे मागे स्वराज्यास हातभार लावतील.पण झाले उलटे.सात आठ वर्षाच्या कालखंडामध्ये स्थिर स्थावर झाल्यावर मोरे.महाराजांवरच उलटले.मोरे घराण्याच्या बखरीत एक पत्रव्यावहार आहे.तो खरा की खोटा माहित नाही.केवळ मोरे उलटले म्हणूनच महाराजांनी जावळी घेतली अस काही नाही.हे कारण तर होतेच.पण आणखीही एक महत्वाचे कारण होते.ते नंतर कधीतरी स्वतंत्र्य लेखात मांडेन.

_____आजही महाबळेश्वर एलफिंस्टन पॉईंट भागात गेलात.त्या घाटाचे मुळ नाव पांगुळा किंवा पांगळा घाट.बखरीत उल्लेख निसणीचा किंवा निशाणीचा घाट असे येतात.हा घाट सांप्रत जावळीवाडी गावाच्या अलीकडील दरे गावात उतरतो.आजही या घाटातून लोक ये जा करतात.एका वेळी एकच माणूस चालून जाईल इतकाच रस्ता आहे.आजूबाजूला तुटलेले कडे जंगल.आजमितीला इतके जंगल आहे.शिवकाळांत तर आणखी आणखी असेल.

तर महाराजांनी रणनिती खेळली काही सैन्य रडतोंडी घाटाने पाठवले.मोरेंना बातमी लागली.मोरेंनी आपले सैन्य रडतोंडी घाटाकडे पाठवले.त्याच वेळात महाराज या अत्यंत निभिड किचकट वाटेने.

पालखी किंवा घोड्याने नाही हं.स्वत:च्या पायांनी उतरले.ते ही कित्येक हजार सैन्य घेऊन.हे धाडस म्हणजे हातात भगवा झेंडा घेऊन सेल्फी काढण्याइतके व सोशल मिडीयावर मी कट्टर हिंदू बोंबलण्या ईतक सोप नव्हे बरं……

महाराजांनी ते स्वत: करुन दाखवल…..

महाराजांनी जावळी मारली…

पुढे येणार्या संकटांचा शिवभूपतींनी योग्य अंदाज घेतला.

योग्य नियोजन,रणनितीने हि लढाई मारली.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलें..”

“ईतिहास हे एक पान आहे ते नेहमी फिरुनच वाचायचे असते.”

#रायरेश्वर_ते_रायगड_भटकंती_मोहिम

#बा_रायगड_परिवार

-नवनाथ आहेर

Advertisements

“पन्हाळा ते पावनखिंड-खेळणा(विशाळगड)” भाग-१ -नवनाथ आहेर

“किल्ले पन्हाळा ते पावनखिंड- किल्ले खेळणा(विशाळगड)”
भाग-१
“पार्श्वभूमी”
______सन१६५९ सालाच्या मध्यापासून ते सन १६६० च्या मध्यापर्यंतचा एक वर्षाचा कालावधी हा शिवशाहिच्या इतिहासाचा महत्वाचा कालखंड होय.या कालखंडात दोन महत्वाची युद्धे जावळी व कोल्हापूर आसमंतात घडली.हि दोनहि युद्धे परस्पर पुरक आहेत.आदिलशाहीच्या नामवंत सरदारांनी महाराजांच्या नुकत्याच सुरु झालेल्या स्वराज्यावर जे आघात केले व त्यातून महाराज कसे बचावले.याचा सप्रमाण आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे.अफजलखान वधापासून सुरु झालेला हा रण संग्राम पन्हाळा ते पावनखिंड-विशाळगड या लढाईत बाजीप्रभू देशपांडे,विर शिवा काशिद व समस्त बांदल विरांच्या आत्मबलिदानाने संपला.खर तर संपला असे म्हणता येणार नाही.तसे संपुर्ण शिवचरीत्रच रोमहर्षक,पुढिल कित्येक पिढ्यांना प्रेरणादायक आहे.विशाळगडा नंतरही कित्येक महत्वाच्या घटना पुढे घडल्या आहेत.त्यातील हि एक महत्वाच्या घटनेवर मी नमनाला घडाभर तेल अर्पण करतो.पन्हाळा ते पावनखिंड हे प्रकरण माहित नाही असा सुपुत्र वा सुपुत्री या महाराष्ट्र देशी मिळणार नाही.अनेक जणांनी या ऐतिहासिक वाटेवर अभ्यासू भटकंती केली आहे.ज्यांनी केली नसेल तर अवश्य जाऊन यावे.हा मार्ग अनेक रणधुरंधरांच्या रुधिर बिंदूंनी पावन झाला आहे.तेथील माती भवानीचा भंडारा मानून भाळी ल्या.त्यातून पुढिल जिवन जगण्यास नक्कीच आगाद प्रेरणा मिळेल.या मार्गावरील सह्याद्री,अनुस्करा व आंबा घाट,मलकापूर पेठ,पावडाई खिंड,येळवण जुगाई खिंड,घोडखिंड,मलकापूर मार्गावरील खिंड,पांढरेपाणी परिसर हा सर्वच भाग अभ्यासण्यासारखा आहे.
______१० नोव्हेंबर १६५९ जनीच्या टेंभ्याखालून एक किंकाळी उठली.साक्षात यमाचाही हिशोब चुकला होता.महाराजांनी अफजलखान मारला व नंतर त्या जावळीच्या घनदाट आरण्यात एकच रणधुमाळी माजली.जावळीच्या त्या निभिड आरण्यात या शिवबाच्या शिवगणांनी जे तांडव चालू केले.ते रोखायला आता आफजल खान फौजेचा कुणी खान जिवंत नव्हता.तान्हाजी मालुसुरे,कान्होजी जेधे,बाजी या मावळमातीत कसलेल्या रणमर्दांनी हातीच्या तलवारी अशा काही पेलल्या की त्या साक्षात लवलव करणार्या विंचवाच्या नांग्याच होत्या.त्यांच्या दंशातून कुणी वाचने कदापीच शक्य नव्हते.आफजल खानाच्या फौजेला इतका हादरा बसला होता की, कुठुन सु सु करत बाण येईल,कुठल्या झाडाच्या मागून सपकन…एखादा वार होईल हे कळत नव्हते.त्या जावळीच्या जंगलांत आता भुतांचा वावर होता.भूतच होती ती आई भवानीची भूत स्वराज्यावर जिव ओवाळून टाकणारी.त्या भूतांचा राजा तिकडे स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाला चारी मुंड्या चित करुन प्रतापगडावर पोहोचलाही होता.खान खान..मेला.खानाच्या फौजेला जराही धीर राहिला नव्हता.मोरे प्रतापराव मोरे तोच तो खानाचा वाटाड्या त्यानेच तर खानाला हि जावळीचा वाट दाखवली होती.जावळीच्या चंद्रराव मोर्यांचा भाऊबंध होता तो.महाराजांनी नुकतीच जावळी मारली.शंभू महादेव महाबळेश्रराजवळच्या निश्रेणीच्या घाटाने येऊन.त्याचा सुड घेण्यासाठी हा हि खानाला सामिल झाला होता.खानाचे बडे बडे सरदारही भेदरलेच होते.
वाट मिळेल तिकडे नुसते पळत होते.कोण होते त्यात मुसेखान,हसनखान,याकूतखान,अंकुशखान दस्तुरखुद्द आफजलखानाचा मुलगा फाजलखानही होता की.सारे रडकुंडीला आले होते.मराठे काही सोडत नाहीत आता.त्यात ते निभिड जावळीचे आरण्य पळावं तर कुठ पळावं? वाट माहित नाही.पळता पळता मध्येच दहा पाच मराठ्यांची तुकडी सर्रकन जाताना दिसायची अन् जिवाच पाणी पाणी व्हायच.एकतर शरण नाहितर मरण.शरण येणार्यांना मराठ्यांकडे नेहमी जिवदानच होते.ज्यांस ते ठावे होते.त्यांनी ते केले.पण सरदारकी गाजविणारे ते मात्र आपली आब्रू राखण्यास पळत होते.
________________________________________
“अस्या रितीने संकटातून सुटका झाल्यानंतर शिवाजीराजे आपल्या दोन जिवलग सहाय्यकांसह प्रतापगड चढून गेले आणि त्यांनी तेथून खुणेची तोफ उडवली.खालच्या खोर्यांत लपून बसलेले शिवाजीराजांचे सैन्य ह्याच खुणेच्या तोफेची वाट पहात होते.ताबडतोब मोरो त्रिंबक आणि नेतोजी पालकर ह्यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांनीं आणि इतर हजारो मावळ्यांनी चोहों बाजूंनी विजापूर छावणीवर हल्ला चढविला.आपल्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून खानाच्या आधिकार्यांचे आणि सैन्याचे धाबे दणाणले आणि त्या अनोळखी प्रदेशांत अनपेक्षितपणे झालेला हल्ला पाहून जणू प्रत्येक झाडाझुडपातून शत्रू आपल्यावर चालून येत आहे,असा भास त्यांना झाला.विजापूर सैन्यांत फार मोठी कत्तल घडून आली.”
-औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास
_________________________________________
______फाजलखानाचा जिव कासाविस झाला होता.तो आपल्या वाईतील कुटुंब कबिल्यासाठी त्याच तर सारच लुटल गेल होत.बाप मारला गेला.भाऊ पकडले गेले.स्वत:ही पळून पळून बेजार झालेला.कुणी मराठा भेटला.प्रतापराव मोरेच होता तो.त्याला पुन्हा या चार चौघांनी लालूच दाखवली.वतनासाठी लालसलेली ती माणसं तुरंत बेईमान झाली.फाजलखानाला वाट दाखवत ती त्याला
जावळीच्या रानातून वर घेऊन आली.शक्य होईल तेवढ्या चलाखी चपळाईने ते वाईकडे पळत होते.पोटात अन्न नाही.पाणी नाही.फक्त पळणेच त्यांना माहित होते.इकडे वाईतील सर्वच मंडळी घाटाखाला प्रतापगडाच्या कुशित आपल्या धन्याचे काय झाले असेल याच चिंतेत गुंतली होती.नव्हे त्यांना माहित होत.नव्हे नव्हे सर्व ठरलेलच होत.शिवाजी महाराज आत काही खानाच्या ताब्यातून वाचत नाहित.असा सर्व एकंदरीत गोंधळ चालू होता.फाजलखान व त्याच्यासोबत काहीजण असे कसेतरी,हेलकावे खांत,रक्ताळलेल्या अवस्थेत वाईतील वाड्यावर पोहोचले.इकडे तो पर्यंत कुणाला काही माहिती नव्हती.हे पळत येणारे विर पहारा व वाड्यातील लोकांनी पाहिले.
“खान मेला..?”
हे ऐकून खानाच्या जनान्यात व वाड्यात एकच गोंधळ उडाला.
“पळा…पळा लवकर पळा…”
फाजलखानाने आपल्या फौजेला आदेशच दिला.जवळ शक्य होईल तेवढा खजिना जडजवाहिर सोबत घेतले.हत्ती,पागा सर्व सोडून फाजलखान निघण्याच्या तयारीस लागला.जनाना पालखीत घेण्याऐवजी त्यांनी घोड्यावरच घेऊन निघाला.वाईच्या बाहेर पडला.तो वाईच्या बाहेर पडतो न पडतो तोच.मराठे वाईत पोहोचले.खानाने त्या मशाली दुरुनच पाहिल्या होत्या.पसरणीच्या घाटाने नेतोजी पालकर प्रतापगडाहून वाईस येत होते.बघता बघता खान मेल्याची खबर वाईत पसरली.आनंदी आनंद झाला.
नेतोजींनी एकदम वाड्याला वेढा घातला.पण खानाचे नशिब बलवत्तर म्हणून तो अगदी काही वेळ आधीच तेथून निसटला.नेतोजींस समजले नेतोजींनी त्याचा पाठलाग चालू केला.पण फाजलखान बराच पुढे निघून आला होता.खानाच्या फौजेचा काही सुगावा लागत नाही म्हणून नेतोजी मागे फिरले.काल आफजलखानाच्या वधानंतर नेतोजींनी अचाट कामगिरी करुन विजापूरी फौजेची दानादाण उडविली.महाराज वाईत आले.तसेच नाईकजी पांडरे,सिद्दि हिलाल,नाईकजी खराटे सर्व वाईत जमा झाले.

______आता महाराजांनी या घडलेल्या घटनेचा फायदा घ्यायचे ठरविले व सर्फराईझ अटॅक चालू केले.शत्रूला कळेपर्यंत मराठे ठाणीच्या ठाणी मारु लागले.आफजलखानाने घेतलेली सर्वच्या सर्व ठाणी परत स्वराज्यात सामिल झाली.महाराज स्वत: सातारा प्रांतात घुसले.नेतोजी पालकर जे सुसाट सुटले ते थेट विजापूरी आदिलशाहीच्या मुलुखात.त्याच बरोबर महाराजांचा एक सरदार दोरोजी यांना महाराजांनी खाली कोकणातील आदिलशाही मुलुखावर सोडले.हे तिघे ज्या वेगाने सुटले.त्यांचा वेग हा वार्यापेक्षा जास्त होता.त्यांचा इरादा नेक होता.स्वराज्य स्वराज्य आता विस्तारत जाऊ लागले.कृष्णा,वेणा,वसना,उर्मिला या सर्व नद्यांच्या सव्य आपसव्य मुलुख आता स्वतंत्र्य होऊ लागला.महाराज आता कृष्णा कोयना संगमाकडे.एरवी सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला.एक रणसंग्राम म्हणजे अफजलखान व शिवाजी महाराज.या संग्रामाचाआफजलखान वधाने शेवट झाला होता.खुद्द आदिलशहा व त्याची बडी बेगम विजयाच्या शिवरायांच्या पराजयाची बातमी ऐकण्यास विजापूरातील आपल्या खासगी वाड्यात मश्गूल होते.एवढ्यात विजापूरात बातमी पोहोचली.आफजलखान मारला गेला.सारी दौलत,खजिना,जड जवाहिर सर्व सर्व लुटले गेले.आदिलशाहिची झोप उडाली.आता आफजलखान शिवाजीराजांना ठार मारणार व त्यांचे मुंडके विजापूरी दरबारात नव्हे वेशिवर भाल्याच्या टोकावर लावून मी आता मिरवणार या भ्रामक कल्पनेत असलेल्या अदिलशाही दरबारावर जणू आफाळच कोसळले.सार्या विजापूर शहरात गडबड गोंधळ उडाला.जणू सुतक पडल्यासारखे सबंध शहर सुतकात पडले.फाजलखान,मुसेखान,अंकुशखान वगैरे मंडळी कसीबसी विजापूरांत येऊन पोहोचली.सर्व जण आपल्या झालेल्या परिस्थितीने एकदमच बेहाल झाले होते.मराठ्यांच्या तलवारींचा तडाखा त्यांना सोसवला नव्हता.फाजलखानास सर्वांत जास्त चिंता होती ती न राहिलेल्या आब्रूची आपमान व नुकसानीने तो आतल्या आत मुसमुसत होता.पण काही काही करु शकत नव्हता.त्याची गाठ अखेर सह्याद्रीच्या दर्याखोर्यांत कसलेल्या व शंभूमहादेवासमान असणार्या शिवरायांच्या चरणी ईमान वाहणार्या रणमर्दांशी पडली होती.मान खाली घालून फाजलखान आदिलशहासमोर गेला.
_______थोडेच दिवस उलटले असतील तोच बघता बघता शहरात आणखी एक बातमी पसरली.की,शिवाजी राजांची फौज आता कोल्हापूरच्या दिशेने निघाली आहे.
“अहो म्हणजे थेट विजापूरच्याच दिशेने….!”
महाराज वाटेतील सर्व आदिलशाही मुलुख स्वराज्यात सामिल करत होते.वाई पासून ते कर्हाडपर्यंतचा मुलूख महाराजांनी जिंकला हे ऐकून आदिलशाहि दरबार चिंतेत पडला.शिवाजी राजे कोल्हापूरच्या दिशेने निघालेत.
_________________________________________
“अफजल वधोत्तर शिवाजीराजे यवनव्याप्त वाई लुटून कोल्हापूरास गेले.”
-शिवकाव्य(संकलक-आप्पा परब)

“पुढें शत्रुसैन्यानें रक्षिलेल्या चंदनवंदन ह्या दोनहि किल्ल्यांस त्याच्या(नेतोजीच्या)सैन्यानी वेढा दिला.”
-श्रीशिवभारत.अध्याय२३.श्लोक-५२

“चंदन -वंदन शिवाजीराजांनी घेतला.-”
-९१ कलमी बखर
_________________________________________
_______त्यांचा हल्ला पन्हाळ्यावर नक्की होणार हे आता आदिलशहाने जाणले होते.त्याची छाती दडपली जात होती.शिवाजी महाराज आपल्यावर चालून येतील हे कोणाला स्वप्नातही खरे वाटत नव्हते.सारा हिंदुस्थानच प्रतापगडाच्या दिशेने डोळे लावून बसला होता.कोण होते यात.इंग्रज,डच,पोर्तुगिज,कुतुबशहा,औरंगजेब,जंजिर्याचा सिद्दि,सर्व किल्लेदार,ठाणेदार,सुभेदार,अमीन हे सर्व सर्व यात सामिल होते.हे सर्वच आगदी निवांत होते.आनंदात होते.अद्याप खानाच्या बर्बादीची मुस्तकीम खबर कोणालाच कळालेली नव्हती.एक आदिलशाही ठाणे जिंकायचे.त्याची व्यावस्था लावून पुढे कूच करायचे असे महाराजांचे चालू होते.
_________________________________________
“अबदुलखान हा जाऊलीत बुडविला,तेथें भोसल्यांच्या सरदारांनी पाळत करुन वसंतगडीहून स्वारा जाऊन,ते ठाणे(मसूर) घेऊन,आपला बाप(सुलतानजी जगदाळे) दस्त करुन,वसंतगडास आणला आणि त्याची गर्दन मारिली.”
-महाराष्ट्र इतिहास साहित्य खंड १५(संकलक-आप्पा परब)
(सुलतानजी जगदाळे हा वतनदारीच्या वादांत शहाजीराजेंच्या विरोधांत होता.सुलतानजी जगदळे आदिलशाहिशी वतनासाठी एकनिष्ठ होता आणि म्हणून अफजल मोहिम प्रसंगी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तो अफजलखानास सामिल होता आणि म्हणून महाराजांच्या सरदारांनी त्याच्यावर पाळत ठेवून.अफजल वधोत्तर त्याचा वध केला.)

“नंतर खटाव,मायणी,रामापूर,कलेढोण,वाळवें,हलजयंतिका,अष्टि,अष्टें,वडगांव,वेलापूर,औदुंबर,मसूर,कर्हाड,सुपें,तांबे,पाली,नेरलें,कामेरी,विसापूर,सावें,उरण,कौळें,कोल्हापूर.ह्या स्थळांवर बलवान वीरांनी(शिवाजीराज् व सरदार)सैन्यासह हल्ला करुन त्यांजपासून पुष्कळ खंडणी घेतली आणि त्यांस अभय देऊन तीं स्थळें आपल्या सत्तेखाला आणिलीं.”

-श्रीशिवभारत अध्याय २३,श्लोक-५८ ते ६१
_________________________________________
_______तांबे,पाली,नेरले,कामेरी,विसापूर,सावे,उरण,कोळे हा सबंध मुलूख महाराजांनी घेतला.आणि महाराज आता आले..आले… पन्हाळ्याजवळ.
महाराष्ट्र देशीच्या एका द्नात कालखंडातील वैभवकाळांत राजा शिलाहार गंडरादित्य यांनी बांधलेल्या व शिलाहारांच्या राजधानीचा किल्ला. किल्ले पन्हाळा.महाराजांच्या समशेरीचे टोक आता पन्हाळ्याच्या छाताडाकडे वळले.तो दिवस होता.मार्गशिर्ष वद्य६(२५ नोव्हेंबर १६५९)अवघा पाच कोस पन्हाळा किल्ला राहिला.बघता बघता महाराज पन्हाळ्याच्या पायथ्याला पोहोचले व महाराजांनी पन्हाळ्याला वेढा दिला.गडाला मोर्चे लागले.

“आले….आले…मराठे आले…!”

कोण?कोण?शिवाजी महाराज?कसे?काय?कुठुन?कधी?.

किल्लेदार हादरला.खाली मराठे पाहिले व तो कळून चुकला.कारण त्याच्या पर्यंतही आजून बातमी पोहोचली नव्हती.तो लटपटू लागला.मराठे गड चढू लागले….

क्रमश:

धन्यवाद..

संदर्भ आधार-
*श्रीशिवभारत
*औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास
*महाराष्ट्र इतिहास साहित्य खंड १५
(संकलक-आप्पा परब)
(संकलक आप्पा परब)
*रणपती शिवाजी महाराज
(आप्पा परब)

संकलक-
नवनाथ आहेर

शिवरायांची  बसरुर(बेदनूर)(उडुपी कुंदापूर तालूका) मोहिम व त्या नंतरचा त्यांचा दरारा अस्सल साधनांतून व पत्रांतून……”नवनाथ आहेर

“शिवरायांची बसरुर(बेदनूर)(उडुपी कुंदापूर तालूका) मोहिम व त्या नंतरचा त्यांचा दरारा अस्सल साधनांतून व पत्रांतून……”

८ फेब्रुवारी १६६५
_______________________________________
इ.स १६६५ मार्च १४.
कारवार(मास्टर)-सुरत प्रेसिडेंट.
“फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले,ते गोव्यावरुन कांहिहि विरोध झाल्याशिवाय बार्सिलोरपर्यंत जाऊन,ते बंदर लुटून,गोकर्णला परत आले.”
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक१०४४
_________________________________________
“शके १५८६ माघ मासी राजश्री जाहाजांत बैसोन बसनुरास गेले.तें शहर मारुन आले.”
-जेधे शकावली
_________________________________________
“बिदनुरीं शिवानाईक जंगम होता.त्याचे शहर बसनूर म्हणून थोर नामांकित होतें.दर्याकिनारा,तेथें पाळती पाळवून पाळती आणूंन,वरघाटे जातां मार्ग नाही.म्हणून पाणियांतील आपलीं जाहाजें आणून सिद्ध तरुन आपण राजे खासा जाहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकीं दिवस उगवीवयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते.एकाएकी जाहाजांतून खाली उतरले.शहर मारिले.एक दिवस शहर लुटून फन्ना केलें.बसनूरची मत्ता अगणिंत माल जडजवाहिर कापड जिन्नस घेऊन आपले देशास आले.
-सभासद बखर
_________________________________________
“सिंधुदूर्गी तमाम आरमार जहाजे आणून मावळे जमाव घेऊन जहाजांत बसून पेठ बसनूर प्रांत गोकर्ण समुद्र तीर बंदर मोठें बिदनूरकरांचे होतें,ते मारिले,बहुत मत्ता द्रव्य सांपडलें.साहुकार धरुन मालमत्ता घेऊन रायगडास कार्य सिद्ध करुन आले.”
-मराठ्यांची ९१ कलमी
_______________________________________
“मग तेथून बेदनूरी सीवाप्पानाईक म्हणोन राजा होता.त्याचे शहर बेदनूर म्हणोन थोर नामांकीत दर्याकिनारा होतें.तेथील पालद आणोन वर घाट जाता तो मार्ग नाही म्हणोन आपली पाणीयातील जहाचे आणोन सिद्ध करोन आपण व हशम लोक जहाजांत बसोन निघाले.ते येकायेकी दिवस उगवावयासी बदनूक शहरास लोक समव्त दाखल होऊन,ते शहलचे लोक बेफाम होते;तो येकायेकी शहरचे मजितीत जाऊन लोक समवेत उतरुन कुल शहर मारिले व येक दिवस लुटोन फना केलें.
-शेडगांवकर भोसले बखर
_______________________________________

“खासा स्वारी शिंदीदुर्ग मालवण हेथे येऊन,आरमाराची तयारी करवून,दहशत,दबदबा आले,हे ऐकून शत्रुसैन्य घाबरले.
-श्रीशिवदिग्विजय बखर
_______________________________________
“हसनूर,प्रांत(बिदनूर) शहर मातबर दर्याकिनारा आहे.तेंथें बहूत द्रव्याधिपती आहेत म्हणून समजलियावरि बातमी आणून स्वारी करावी,शहरे मारावीं,प्रांत घेऊन ठाणीं घालावीं,असे महाराजांंनी चित्तांत आणूव,ते समयी सारे आरमार सिद्ध करुन,आपणहि थोरले पास त्याजवरी बसोन,दर्यांतून जावे असा सिद्धांच करुन खुषकीने फौजा रवाना केल्या आणि मालवणावरुन दर्यामार्गेच जाऊन हसनूर पेठ असावध होती,तेथे जाऊन पेठ लुटली.प्रांतही लुटला.तीन चार दिवस स्वारी तेथेंच राहून सर्व मत्ता जाहाजावकि चढविली.सुरतेचेसारखेच शहर होते.दोन तीन करोडींचा विषय सांपडला..हें पाहून शिवाप्पा नाईक बिदनूरकर संस्थांनी होते.त्यास बहूत भय प्राप्त होऊन(त्यांनी)वकील पाठविलें आणि महाराजांस नजराणा पोशाख,जवाहीर,लाख रुपये नख्त नजर ऐसे पाठविलें आणि तह ठरवून महाराजांचे दर्शनास आले.दरसाल खंडणी तीन लक्ष देत जावी,ऐसा ठराव केला.(महाराजांनी)वकिलीस उमाजीपंत आपणांकजून ठेविले.
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_________________________________________
“इ.स. १६६५ एप्रिल ६.पोर्तूगीज व्हाईसराय-शिवाजीराजे
कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं.त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले.त्यांनी तुमची जहाजें झरुन आणूंन बंदरांत ठेवली.परंतू तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली.
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५२
_________________________________________
“इ.स. १६६५ एप्रिल १४.कॉन्सल लॅनॉय आलेपो-अर्ल ऑफ विंचिलझिया
सुरतेच्या प्रेसिडेंटचे पत्र आले आहे की,शिवाजीराजांपासून सुरत सुरक्षित आहे.परंतू मोगलांच्या मुलुखांत ते स्वैर संचार करुन कित्येक शहरे लुटीत आहेत.बादशहाचे बडें सैन्य त्यांच्यावर आले आसतांहि वाटेंत शत्रुविरुद्ध नाकेबंदी करीत करीत ते थेट गोव्या पर्यंत किनार्याने जाऊन आले.
-शिवकालान पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५६
_________________________________________
इ.स. १६६५ जून २९.डाग रजि. रेसिडेंट लींडर्स(वेंगुर्ला)-बटेव्हिया.
शिवाजीराजांचा लुटमारीचा क्रम पूर्ववत चालू आहे.मागलें पतेर रवाना झाल्यानंतर त्यांनी कानडा प्रांतावर हल्ला करुन ८० हजार गिल्डरची लूट मिळविली.त्याचप्रमाणें डच कंपनीसाठी माल खरेदी तरावा म्हणून काशीबा व संतुबा शेणवी ह्या वेंगुर्ल्याच्या प्रसिद्ध व्यापार्यांनी पाठविलेले ५०० होनहम त्यांनी लुटले.
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५६
_________________________________________
______वरील अस्सल समकालीन साधनांचा क्रम आपण पाहिला.शिवाजीमहाराजांनी बसरुर(बेदनूर) वर स्वारी केल्याचे हे उल्लेख आहे.१६७४ मध्ये महाराज उत्तरेस सुरतेवर चालून गेले आणि फेब्रुवारी १६६५ मध्ये बसरुरवर चालून गेले.इ.स.१६६४ डीसेंबर मध्ये महाराज हुबळी फोंडा पर्यंत दक्षिणेकडे आले.मसुरा,आचरा,कुडाळ,सोंदे ह्या राज्यांची अर्थात स्वराज्याच्या सिमेवरची पोर्तुगिज इंग्रजांची चाललेली अधाधुंदी थांबविण्यासाठी किल्ले सिंधुदूर्गाची निर्मिती केली.पण जानेवारी १६६४ च्या सुरतेच्या छाप्यामधील धन सिंधुदूर्गच्या कामास कमी पडत आहे.हे लक्षांत आल्यावर महाराज आपल्या वडिलोपार्जित होय वडिलोपार्जित जहागिर सिमेवर असलेल्या केळदी राज्यांतील बसरुरवर चालून गेले.आता म्हणाल की बसरुर हि महाराजांची वडिलोपार्जित जहागिर कशी तर यास श्री शिवदिग्विजय बखर साक्ष देतेय.की शहाजीराजेंनी या पुर्वी बसरुरवर मोहिम करुन हा प्रांत जिंकला होता.

“शके १५८६ पादशाही हुकूम बिंदनूरकरांचे पारिुत्य करणें,म्हणोन आला.त्यावरुन शहाजीराजे यांणी फौज सरंजाम तयारी करविली.विठोजीराजे व शरीफजीराजे यांचा वंश अद्यापि चंदावर प्रांती आहे.शहाजीराजे यांणी चिरंजिव व्यंकोजीराजे यांस,सर्वांची निरवणूक करुन,आपण कूच-दरकूच बिदनूर प्रांती आले.बिदनूरकरहि तयार होऊन संमुख आले.उभयतांची गांठ पडोन लढाई सरहद्दीवरी बिदनुरकरांची,मोठी कजाखिची जाली.बिदनूरकरांचे सरंजामाहून (शहाजी)राजांचा सरंजाम फार मोठा.एक माणूस बिदनूकरांचे तर राजांकडील दहा,असे होण्यामुळे हतवीर्य होऊन,(बिदनूरकर शहाजी)राजांस शरणागत आले.ते समयीं विजापूरकरांकडील महाल घेतला.तो सोडून सरकारांत नेमणुकेप्रमाणे निसबतीस लागला.बिदनूरकरांचा प्रांत राजे यांणी स्वेच्छेकरुन उपजीवनार्थ रक्षिला तो वेगळा करुन,बाकी दरोबस्त आपला खालिसा केला.”
-श्री शिवदिग्विजय बखर
________याचबरोबर बसरुरच्या मोहिमेस आणखी एक महत्वाचे कारण होते.ते हि शिवदिग्विजय बखरींत आले आहे.तो पाहूयात.

“बिदनुरकरांचे स्वारीमुळे(शहाजीराजांचा)नाश झाला,असी महाराजांची कल्पना होऊन शिवाप्पानाईक पाळेगार बिदनूरकर ह्यास पत्र महाराजांनी पाठविलें कीं,आम्हासी रुजू राहून चाकर म्हणवावें व दोन जागा आहेत?(कनकग्री,अनागोंदी,कंपली)त्या द्याव्या व चाकरीस यावे.न आल्यास चाकरीचे फौजेऐवजी करमार द्यावा.ह्याप्रमाणे तुमचे विचारास आल्यास बचाव करुन घ्यावा;नाहीं तरी तुम्ही आपली तयारी करणें
तें पत्र पाहून,शहाजीराजांसी रुजू होऊन,(आमच्या मुलुखापैकीं कांही) मुलुख दिल्हा.त्यांणी(शहाजीराजांनी आमच्या) पोटापुरता ठेविला,त्यास उपदेरव देण्याचा हेतू चिरंजीव(शिवाजीराजे) कर्ते झाले.ऐशास हे मर्द आम्ही नामर्द आहों कीं काय?असे बोलून (शिवाजीमहालाजांच्या) पत्राचा अव्हेर केला.
-श्रिशिवदिग्विजय बखर
_______शहाजीराजांस आदिलशहाचा हुकूम आला की बिदनूरकरांचे पारिपत्य करने.त्याप्रमाणे शहाजीराजे बिदनूरवर चालून गेले.तो प्रांत घेतला.त्यांच्या पोटा पाण्यापुरता कसबा तेथे राखला.त्यांना जिवदान दिले.बाकीचे राज्य खालसा केले.पुढे शिवाजीराजांनी आपल्या कारकिर्तीत वडीलोपार्जित जहागिरीवर हक्क सांगत तात्कालीन बेदनूरचा राजा शिवाप्पा नाईक ह्याला पत्र लिहिले.परंतू,त्याने या पत्राचा अपमान केला.उलट तो म्हटला की,
शहाजीराजांनी आम्हास राज्य दिले.त्यांचे चिरंजीव उपद्रव करतायेत.तेच मर्द आहेत मग आम्ही काय नामर्द आहोत काय?
आणि..
या सह्यशिखरांचा,गिरीशिखरांचा स्वामी खवळला व थेट बेदनूरकरांवर चालून गेला.मध्ये गोवा राज्याची सिमा लागते.आरे टाप झाली नाही महाराजांची तरांडी,तारवं,जहाज आडविण्याची.महाराज दिवस उगवते गेले आणि बिदनूर मारले.
_______वरील पत्रव्यावहार निट वाचा.गोव्यात हिंदूंनी पोर्तुगिजांचा धर्म स्विकारावा म्हणून एक्वीझिशनच्या नावाखाली कित्येक कित्येक अत्याचार केले.सत्ता चालविली.हिंदुंच्या कत्तला केल्या.तो एक्युजिशनचा टेबल अजूनही आहे.त्याला बांधून हिंदूंना जिवंत जाळले जायचे,जिवंत अंगावर उकळते तेल ओतले जायचे,जिवंतच कापले जायचे.त्या पोर्तुगिजांची पुढे महाराज हयात असेपर्यंत टाप झाली नाही.
____आणखा एक उदाहरण-
“गोव्याचा व्हाईसरॉय कोंदि द सांव्हिसेंति मेला असून,आतां त्याचे जागीं तीन आधिकारी काम करितात.व्हाईसरॉय मरण्यापूर्वा त्यानें बारकाईंने तपास केला असता,सर्व शहरांत मिळून शिवाजीराजांचे ४-५ शें लोक लपून राहिलेले आढळले.तेव्हा, स्वहस्तांने शिवाजीराजांच्या वकिलाच्या दोन-तीन थोबाडींत देऊन आला आणि त्या सर्व कैद्यांना त्यानें गोव्यातून हद्दपार केले.हे ऐकून शिवाजीराजांनी ८-१० हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वारांनिशीं गोव्यावर स्वारी करण्याचे जाहीर केले.
-पत्र क्रमांक १२२८

“शिवाजीराजांनी सुमारे चार पाचशें लोक गोव्यात घुसडून दिले होते.थोड्याच वेळांत ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्रीं एकदम उठाव केला असता तर गोव्याचा कोणताहि एक दरवाजा ताब्यांत घेऊन,पोरेतुगिजांनी पुरेसे सैन्य रणांगणावर उभे करण्याचे पूर्वींच,शिवाजीराजांचे लोक आंत शिरुन त्यांनी गोवा काबीज केंले असते.परंतु शिवाजीराजे गोव्यापर्यंत आल्यावर,आपला कट उघडकीस आला;आपले लोक पकडले गेले आणि पोर्तुगिज लोकहि सज्ज होऊन राहिले;हे पाहून शिवाजीराजे आपल्या गोवा सरहद्दीवरील मुलुखाचा कडेकोट बंदोबस्त करुन राजगडला परत आले.”
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रं.१२२८
_______महाराजांनी आपले काही लोक गोव्यात घुसवले होते.नंतर कट उघडकीस आला.गोव्याचा व्हॉईसरॉय मेला तर सर्वांना संशय होता कि मराठ्यांनीच त्याला विषबाधा केली.या सर्व पत्रव्यावहारावरुन व साधनांवरुन लक्षात आलेच असेल.
मराठ्यांचा महाराजांचा दरारा काय होता तो.
एकदा एकदा पन्हाळ्यावर युनियन जॅक लावून तोफा डागल्या तर महाराजांनी सबंध राजपूरची वखारच खणून काढली.तो दबदबा होता त्या काळात राजांचा.
कधी गुगल map काढून बघा कुठे पुणे,कुठे रायगड,कुठे तो गोवा,मालवण,कुठे ते बिदूनर प्रांत मग नक्की कळेल तुम्हाला वाघाचा दबदबा कसा व कुठ पोहोत असतो.

“आणि………
आम्ही कर्मदरीद्री त्यांच्या सिंहासनस्थित मेघडंबरीवर चढून त्यांच्या सोबत सेल्फी काढतो.
इतकी आमची मजाल..”

धन्यवाद..

संदर्भ-
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १,२
सभासद बखर
मल्हार रामराव चिटणिस बखर
जेधे शकावली
मराठ्यांची ९१ कलमी बखर
शेडगांवकर भोसले बखर
रणपती शिवाजी महाराज-आप्पा परब
सिंधुदूर्ग-आप्पा परब

लेखन व संकलन-
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)

एलफिंस्टन पॉईंट महाबळेश्वर(जावळी)-नवनाथ आहेर

“जावळीच्या रानांत….”

“आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न धरिता(करीता), कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणामध्ये परस्परे कलह लाऊन दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपणहून गेले, कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करवले, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले.”

______खुद्द शिवाजीराजे व मावळे चाळीसहजार घोऊन रात्री चालोन तिसरे रोजी श्रीमहाबळेश्वरावरुन निशाणीचा घाट उतरुन जाऊलीस गेले.रघुनाथ बल्लाळ सबनविस व माणकोजी दहातोंडे सरनौबत त्या समागमें फौज देऊन रडतोंडीच्या घाटें तिकडून ते आले.जाऊलीस वेढा घातला.दोन प्रहर पावेतो भांडण झाले.गांव घेतला.बाजीराऊ आणि कृष्णाराऊ राजे मोरे पंधरा सोळा वर्षाची उमर होते.त्यांस स्रीयांदेखील कैद केले.मत्ता द्रव्य बहुत पुरातन राज्यभंग केला.चंद्रराऊ मोरे घेऊन पुण्यास आले.

-९१ कलमी बखर

_____थोडा सरंजाम केला.त्यांणी(मोरेंनी) अमानुष कृती केली.तस्मात त्या जागेचा लाभकाळ आमचा आहे.त्या आर्थी कोणताही आंदेशा न देऊन सर्वांचे एकदिलाने पुरंदराहून श्रीमहाबळेश्वरी येऊन श्रीसांबसदाशिवाचे दर्शन घेतले.ध्यान करीते झाले.

ऐसे ध्यान करुन त्याच घाटांनी खांसा उतरले.रघुनाथ बल्लाळ आत्रे(कोरडे)ह्यांजबराबर पांच सांत हजार मावळे व पांच चारशे स्वार देऊन,रडतोंडीचे घाटांनी यावे असे संकेताने एकसमायावच्छदें उभय सैन्य जावळीस सुर्योदयापूर्वी येऊन लागली.

-श्रीशिवदिग्विजय

______शिवाजीराजांनी आपल्या सैन्यास रडतोंडीच्या (आश्रुमुखीच्या)घाटांवरुन जाण्यस सांगून आपण रात्री.शिवालयांत झोपले.सकाळी ससैन्यासहित निघाले.दुतांकडून शिवाजीराजे ससैन्य आगमन समजल्यावर चंद्ररावाचे सैन्य रडतोंडीच्या घाटाकडे गेले.

-शिवकाव्य

_____सांप्रत महाबळेश्वरच्या “एलफिंन्स्टन पॉईंट” या ठिकाणाहून शिवराय स्वत: चाळीस हजार सैन्य घेऊन खाली उतरले.या बाबतच्या या बखरीतील नोंदी आहे.आणखाही समकालीन साधनांत या नोंदी मिळतात.यात चाळीस हजार सैन्य या बाबत थोडीशी शंका वाटते.संख्या कमी जास्त असेलही…

पण,महाराज याच घाटाने खांसा उतरले हे नक्की.

आता म्हणाल तर काय घाट तर आहे कुणीही उतरेल.

नाही गडे हो…

जावळी म्हणचे जणू गरुडाची बसकण.वाघाची जाळी ती जावळी.अत्यंत घनदाट कड्या कपारी अन जंगलांनी भरलेला हा परिसर.जावळीस उतरण्यास आत्ता बरेच मार्ग आहेत.त्यावेळीहि आणखी असतील….

पण,या घाटाने उतरण्याची महाराजांची रणनिती वेगळी होती.

१६५६ सालाचा सुरुवातीचा कालखंड.जावळीचे “चंद्रराव” बिरुद धारण करणारे “मोरे” महाराजांच्याच कृपेने गादीवर बसले.महाराजांनाही वाटले.पुढे मागे स्वराज्यास हातभार लावतील.पण झाले उलटे.सात आठ वर्षाच्या कालखंडामध्ये स्थिर स्थावर झाल्यावर मोरे.महाराजांवरच उलटले.मोरे घराण्याच्या बखरीत एक पत्रव्यावहार आहे.तो खरा की खोटा माहित नाही.केवळ मोरे उलटले म्हणूनच महाराजांनी जावळी घेतली अस काही नाही.हे कारण तर होतेच.पण आणखीही एक महत्वाचे कारण होते.ते नंतर कधीतरी स्वतंत्र्य लेखात मांडेन.

_____आजही महाबळेश्वर एलफिंस्टन पॉईंट भागात गेलात.त्या घाटाचे मुळ नाव पांगुळा किंवा पांगळा घाट.बखरीत उल्लेख निसणीचा किंवा निशाणीचा घाट असे येतात.हा घाट सांप्रत जावळीवाडी गावाच्या अलीकडील दरे गावात उतरतो.आजही या घाटातून लोक ये जा करतात.एका वेळी एकच माणूस चालून जाईल इतकाच रस्ता आहे.आजूबाजूला तुटलेले कडे जंगल.आजमितीला इतके जंगल आहे.शिवकाळांत तर आणखी आणखी असेल.

तर महाराजांनी रणनिती खेळली काही सैन्य रडतोंडी घाटाने पाठवले.मोरेंना बातमी लागली.मोरेंनी आपले सैन्य रडतोंडी घाटाकडे पाठवले.त्याच वेळात महाराज या अत्यंत निभिड किचकट वाटेने.

पालखी किंवा घोड्याने नाही हं.स्वत:च्या पायांनी उतरले.ते ही कित्येक हजार सैन्य घेऊन.हे धाडस म्हणजे हातात भगवा झेंडा घेऊन सेल्फी काढण्याइतके व सोशल मिडीयावर मी कट्टर हिंदू बोंबलण्या ईतक सोप नव्हे बरं……

महाराजांनी ते स्वत: करुन दाखवल…..

महाराजांनी जावळी मारली…

पुढे येणार्या संकटांचा शिवभूपतींनी योग्य अंदाज घेतला.

योग्य नियोजन,रणनितीने हि लढाई मारली.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलें..”

“ईतिहास हे एक पान आहे ते नेहमी फिरुनच वाचायचे असते.”

#रायरेश्वर_ते_रायगड_भटकंती_मोहिम

#बा_रायगड_परिवार

-नवनाथ आहेर

“जावळीच्या रानांत..”

_____इ स १६७१-७२

“पदाजीयशवंतराऊ सिवतरकर ह्याणे कितीयेक बेसंगपणाची वर्तणूक केली.ह्याबद्दल(शिवाजीराजांनी)साहेबी निकर करुन डोळे काढून गडावरी आदबखाना घातले.”

-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक १४६०

“सिवतर खोरियांत बाबजीराऊ म्हणून पुंड होता.तोही कैद करुन त्याचे डोळे काढिले.”

-सभासद बखर

_____राजाभिषेकाच्या आधी स्वराज्याच्या सरहद्दीवर टक्कर देणार्या परकीय सत्तांना तोंड देणे तर होतेच होते.

पण स्वराज्यातील या अशा प्रकारचे जमिनदार पुंड व गुंड यांचा बंदोबस्त करणे तितकेच गरजेचे होते.

शिवरायांनी गुन्हा साबित झाल्यावर चंद्रराव मोरेंच्या भाऊबंदाचे डोळे काढले.

स्वराज्य साधिण्यासाठी परकियांसोबत स्वराज्यातील बेईमानांना धडा शिकविण्याचे काम केले.

#रायरेश्वर_ते_रायगड

#बा_रायगड_परिवार

-नवनाथ आहेर

बा रायगड,लेखन-नवनाथ आहेर

पाहुन रायगडाला बघ शाही सुलतान धास्तावले,बघ सह्याद्रिच्या कुशित माझे शिवराय विसावले..!!

खुबलढा बुरुंज रडुन सांगतो व्यथा दाबुन ठेवली मनी,
बघ चढुन कधी रायगडाची पायरी,हुंदके येतील तुझ्या कानी…..!!!

नाणे दरवाजाचा बंकी घालतोया साद मध्यरात्री सह्याद्रीच्या शिलेदारांस,
दुरावस्ता झाली हो सह्याद्रीच्या राजाची सावरा मज
घेऊन शुर विरांस……!!

शिवकालीन मार्ग जणु सांगतोय बघ स्वराज्याचे धनी याच वाटेहुन गेले,
शौर्यच लागते चढण्या निभिड ही वाट,कीत्येक इथेच
शांत होऊन मेले…..!!!

शोधुन बघ गडावरील पाण्याची आहेत कीती टाकी,
कळेल मग तुला उघडेल गुपित बाकी,
उगाच नाही रोज साद घालत आम्ही शिवरायांच्या चरणावरी,
कळेल बोलतात का माझ्या राजाला दुर्गविर या भुमीवरी …..!!!!

वाघ जबड्यात हात घालण्याचा करुन बघ एकदा हर्ष,
गड बांधणार्या मावळ्यांनी तिथेही केलाय बघ कमालीचा संघर्ष……!!
पाहुन रायगडाला शाही सुलतान धास्तावले,
बघ सह्याद्रिच्या कुशित माझे शिवराय विसावले..!!

रायगडाच्या नव्हे स्वराज्याच्या महादरवजाची तर रचनाच न्यारी,
कोण घालील असे दुर्गद्नान सांग तुझ्या पदरी….??
काय महान महीमा माझ्या राजाचा जिवंतपणी केला आधार गरीबांस,
आजही कील्ल्यांवर पोट भरतात चिमुकले-
नको करु चार पैशाचा तु विचार…!!

चिलखताप्रमाणेच भासे बुरुंज रायगडाचा चिलखती,
निरखुन बघ कसा जोडला एक एक चिरा सुर्य मावळती….!!

दैवत महाराष्ट्राचे, दैवत रायगडाचे मंदिर जगदिश्वराचे बांधिले दिड गाव उंच गडावरी,
होईल का रे स्वराज्याचा पाईक हिरोजी इंदुलकरांपरी
शिवरायांच्या चरणांची धुळ पडावी मस्तकी म्हणुन कोरिले नाव आपले मंदिराच्या पायरी…..!!!

भवानी कडा बघ जाऊनी याची डोळा याची देही,
दारुगोळा कोठारांनीच राखली होती स्वाराज्याची भुमी,
देतील तेच स्वतः जीवंत शिवबाच्या पराक्रमाची ग्वाही….!!!

वाघासारखाच रुप घेऊन बसला वाघ दरवाजा गडाच्या कुशीत,
जाऊन एकदा डोकावच गड्या कळेल मग,जगला कसा असेल माझा शिवबा रायगडाच्या मुशित…!!!

पाहुन रायगडाला शाही सुलतान धास्तावले,
बघ सह्याद्रिच्या कुशित माझे शिवराय विसावले..!!

होता जरी तो इंग्रज रंगाने गोरा,
मनी होता त्याच्या बेत भलताच काळा,
रडले गडावरील चिरेही गळ्यात घालुन गळा,
असा कसा बेईमान झाला माझ्या शिवबाचा मावळा…!!
करुन फीतुरी फीरंग्यांशी सामिल का रे झाले सरदार नामी,
करणार नाही माझा शिवबा माफ तुम्हाला या जन्मी….!!

काय मिळाले घाव घालुनी स्वराज्यावरी,
शिवरायांनी हिरे, माणिक, मोती उधळले होते त्या दुश्मन आफ्जुल्यावरी….!!

बरसल्या तोफा फीरंगी बा रायगडाच्या कोमल ह्रदयावरी,
असा कसा कोपलास शंभु महादेवा या महान वास्तुवरी,
भुईसपाट झाले आठरा कारखाने व महाल,कोठारे
आता सांग काय देशिल उत्तर..? गेले वाहुन गेले विनाशाचे वारे….!!

कीती मानाचे ते सिंहासन होते बत्तीस मणी,
मान स्वराज्याचा नेले चोरुन कुणी-कुणी….???
शोध घेण्या ठरलो आम्ही कुचकामी,
येईल का सर आम्हा सुरतेच्या खडा न खडा माहीती असणार्या बहीर्जींची,
विचार कर एकदा बसुन शांत मनी……!!

पाहुन रायगडाला शाही सुलतान धास्तावले,
बघ सह्याद्रिच्या कुशित माझे शिवराय विसावले..!!
पाहुन रायगडाला शाही सुलतान धास्तावले,
बघ सह्याद्रिच्या कुशित माझे शिवराय विसावले..!!

लेखन- नवनाथ आहेर

भटकंती व Rock climbing-नवनाथ आहेर

____

बा रायगड परिवार आयोजित दुर्ग लिंगाणा अरोहण मोहिम दिनांक ३/१२/१७ रोजी बा रायगडच्या कोअर टिमने यशस्वी पणे पार पाडली.

पुढे २३/२४/२५

या तीन बॅच आहेत

त्या अनुषंगाने हि प्राथमिक माहिती.
खर, तर शेवत्या घाटावर वसलेला हा देश म्हणजेच घाटमाथा व कोकणाला जोडणारा महत्वाचा दुवा.तसेच शिवकालापासून ते अगदी पंत प्रतिनिधिंच्या  कालखंडापर्यंत कैदखाना म्हणून जनमाणसात प्रचलित असलेला हा निसर्गत: बेलाग व दुर्गमता लाभलेला सुळका सर करुन एकदा त्याच्या माथ्यावर विराजमान होण्याच प्रत्येक दुर्ग भटक्याच स्वप्नच असते.

पण,हल्ली सह्याद्रीचा बाजार मांडून पैसा कमावण्याच एक नविनच गौडबंगाल वाढू लागल आहे.

आय टी क्षेत्रातील,गलेलठ्ठ पगार असणारे,गर्भश्रीमंत सो कॉल्ड प्रोफेशनल लोकांचा एक वेगळा वर्ग याला चांगले खत पाणि घालून मोठा करत आहे.

त्यांचही कार्य कौतुकास्पदच आहे म्हणा. चला या निमित्ताने का होईना या आजकालच्या तरुणाईची पाऊले कधीकाळी शौर्याच्या खाणाखुणा व बाप जाद्यांच्या रुधिरबिंदूंनी पावन झालेला या सह्याद्री व त्यावर वसवलेले गौरवशाली गडकोट धुंडाळतो आहे.पण,असा ट्रेकिंगचा व्यावसाय करणार्यांनी गडरहाळातील लोकांकडेही लक्ष दिले पाहिजे.त्यांच्या पोटापाण्याचाही विचार केला पाहिजे. निदान आपण ज्यांच्या जिवावर कमावतो त्यांचाही विचार हा प्रकर्षाने व्हायलाच हवा.

*ट्रेक ऑर्गनाईजर संस्थांनी खालील काही बाबी पाळने महत्वाचे आहे-

१)प्रथमत आपण ट्रेकिंसाठी नोंदणी केलेल्या

सदस्यांच्या शारिरिक शक्तीचा एनालेसिस करावा.

त्याने यापुर्वी कधी भटकंती केली आहे काय?

त्याला निदान प्राथमिक सुरक्षेची माहिती आहे काय?

२)त्याचा रक्तगट नोंदवून घ्यावा.

३)त्याचा राहता व मुळ पत्ता नोंदवावा.

४)त्याचा आयडी प्रुफचे झेरॉक्स घ्यावे.

५)त्याच्या घरचा एमरजेन्सी फोन क्रमांक घ्यावा.

६)गडावर आपल्या समुहाकडून कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही.याची दक्षता घ्यावी.

७)बिस्लेरी नेणे टाळावे,थर्माकॉलच्या प्लेट नेणे टाळावे.त्याऐवजी, ताट वाटी व २ लिटरची पाणि पिण्याची कायमची बॉटल घेण्यास सदस्यांना सुचना द्याव्यात.

८)आपल्याकडून वन्य प्राण्यांस डिस्टर्ब होईल अशा प्रकारचे वाद्यसंगित(डिजे)  अथवा आरडा ओरडा गोंगाट होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९)मी हल्ली गडांवर सर्रास पाहतो.

सर्वच गडांवर वानर नाहीत.पण,ज्या गडांवर आहेत.त्या ठिकाणी पहायला मिळते. की,त्या वानरांना खाऊ देतात व मग त्यांना काठिने अथवा दगडाने मारतात. शेवटी तो हि एक जिवच आहे.त्याच्यावर हल्ला झाला तर तो प्रतिकार करणारच ना?

पण, काहि महाभागांना त्याचीही मज्जा वाटते.

सोबत एखाद्या मित्र,मैत्रिणीला आणलेलेच असते. मग, मी कसा वेगळा, धाडसी,शूर हे दाखवण्याच्या नादात याचेच ‘माकडचाळे’ सुरु होतात.परिणामी प्रेमळ व फक्त पोटासाठी खाऊ मिळावा या आशेने जवळ आलेली ती वानरे मग आक्रमक होतात.

बर,वानराने जर का कानाखाली मारली तर त्याचे असे काही वळ गालावर उठतात की त्यातून रक्तच बाहेर येते.

(मला अनुभव नाही. पण, घडलेली घटना डोळ्याने पाहिली आहे.)

तेव्हा,त्यांना फक्त खाऊ द्यावा देता आला तर…

नाहितर मुकाट्याने पुढे जावे.त्यांना त्रास देण्यात धन्यता मानू नये.

१०)तुम्ही ज्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात आहात.त्या गडाच्या पायथ्याच्या गावात तुम्ही किती सदस्य आहात.तुमचे वेळेचे नियोजन तेथील गावकर्यांस सांगून मगच पुढे जावे.

११)तेथील गावातील एक जुना जाणता वाटाड्या नेहमी सोबत ठेवावा. कारण, आपण फक्त पुस्तके वाचतो. पण, या लोकांनी तेथील भूगोल लहानपणापासूनच अभ्यासलेला असतो. त्यामुळे, नवनविन काही वास्तू गुहा, टाके, मंदिरे, शिल्पे इ. गोष्टी नव्याने पहायला मिळतात.
वरील डाटा व प्राथमिक सुचना पाळल्याने

होत काय की

तुम्हाला त्रास होत नाही.

काही अनुचित प्रकार घडला

दुखापत झाली.

तर,रक्त वगैरे देण्याची गरज पडल्यास किंवा अन्य काही घटना घडल्यास वरील डाटा उपयोगी पडतो.तसेच गावकर्यांना तुमची पुरेपूर कल्पना असल्यास व तुम्ही रस्ता भटकल्यास त्यांचीही काही मदत होऊ शकते.

 

*सोबत लागणार्या साहित्याची यादी-

१)पोशाख हा सैलसर व संपुर्ण अंग झाकेल असा असावा.निसर्गात अनेक प्रकारचे विषारी व बाधित  किटक, वनस्पती असतात. त्यांचा संपर्क आपल्या शरीराला झाल्यास इंफेक्शन होण्याचा धोका असतो.

२)सोबत सुका खाऊ व दोन ते तीन लिटर पाणी कायम असू द्यावे.

३)चाकू

४)विजेरी(टॉर्च)

५)जास्त जंगलात जात असाल तर एनिमल स्प्रे

६)हिवाळ्यात उबदार कपडे तर पाऊसाळ्यात रेनकोट वापरावे.

७)सोबत एक लाईटर असु द्यावे.

८)एक नोंदवही पेन जवळ बाळगावा.

९)शक्य झाले तर पेंट, रेडीयम किंवा खडू.

तुम्ही ज्या मार्गाने जात आहात त्या मार्गावर खुणा करत चला. म्हणजे रस्ता भटकलात तरी पुन्हा या खुणांच्या आधारे तुम्हास माघारी येता येईल.

१०)हे सामान वाहून नेण्यासाठी एक मजबूत पिशवी.
_____हल्ली अनेक प्रकारचे तंत्रद्नान वापरुन अनेक बेलाग व अवघड सुळके किंवा गडांवर कृत्रीम चढाई केली जाते. गिर्यारोहणात प्रामुख्याने खालील प्रकार पडतात.
अ) डोंगरयात्रा-

या प्रकारात कुठल्याही प्रकारच्या कृत्रिम साधनांचा आधार घेण्याची गरज नसते.या प्रकारात पायर्या असलेले किल्ले चढाई किंवा सोप्या टेकडींहून पायी चालत निसर्गातील विविध स्त्रोतांतून भटकने होय.
ब) मुक्त प्रस्तरारोहन( Free climbing)

हा प्रकारही डोंगरयात्रेसारखाच आहे. कोणतीही कृत्रीम साधने न वापरता सोप्या व नैसर्गिक खाच खळगे लाभलेल्या कातळावर(खडकावर) चढाई करणे होय.डोंगरयात्रेत अशा प्रकारची चढाई थोडयाफार प्रमाणात करावी लागते.मात्र या चढाईसाठी कातळावर निसर्गता खाच खळगे उपलब्ध असणे गरजेचे असते.

निसर्गाने माणसाला चार पॉईंटस बहाल केलेले आहेत.

दोन हात

दोन पाय

या प्रकारात अरोहकाला याच चार टोकांचा वापर करुन व थ्री कॉन्टॅक्ट पद्धतीने चढाई करायची असते.
क)कृत्रीम कातळारोहण(आर्टिफिशिअल क्लाइंबिंग) –

ज्या ठिकाणी निसर्गत: उपलब्ध खाच खळगे नसतात. त्याठिकाणी या प्रकारचे अरोहण करावे लागते.

कृत्रीम अरोहणासाठी लागणारे साहित्य-
१)पोशाख-

डोंगरयात्रेत वापरला जाणारा पोशाख याहि प्रकारात वापरता येतो.

२)शूज-

डोंगरयात्रेत वापरले जाणारे ‘हंटर’ शुज या ठिकाणी उपयोगी पडत नाहित.सपाट परंतू जाड तळवे असणारे कॅनव्हास शूज अवश्यक असतात.

३)रोप-

साधारणता ८ एम एम व

१०.५ किंवा ११ एम एम जाडीचा नायलॉन किंवा पॉलिस्टर मटेरिअलचा दोर अवश्यक असतो.

त्याची लांबी हि तुम्ही अरोहण करत असलेल्या

कातळाच्या किंवा गडाच्या उंचीच्या अंदाजाने घ्यावी लागते.

रोपच्या कॅपासिटिचा एक तक्ता मी येथे देतो.
*नायलॉन मटेरिअलचा रोप

साईझ                      वजन किंवा ताण                                           घेण्याची क्षमता

१)6mm.                               600 kgf

२)8 mm.                              1300 kgf

३)9mm.                                1800kgf

४)10.5mm.(Dynamic)       2300 kgf
*पॉलिस्टर मटेरिअल रोप-
साईझ|                        वजन घेण्याची क्षमता

१)8mm.                 1000kgs

२)10mm.                 1300 kgs(main

Sheet)

३)12mm.(MATT)      1600kgs(main

Sheet)
४)12mm(SHINY)       3300kgs(mainsheet)
5)10mm

Spectra Braid.     4500 kgs(main sheet)
४)पिटॉन व बोल्ट

कातळाच्या खाचेत ठोकायची पट्टी किंवा खिळा(बोल्ट)

५)पिटॉन हॅमर-

पिटॉन ठोकण्यासाठी हातोडा
६)चोकनट-

कातळाच्या खाचेत अडकविण्याचा खडा
७)कॅरॅबिनर-

झडप असलेली धातूची कडी

यात अनेक मटरिअलचे कॅरॅबिनर असतात.

लोखंड

हलक्या वजनाच्या धातूचे

कार्बन फायबर

या प्रत्येक धातूची वजन घेण्याची क्षमता वेगवेगळी असते.

यात लोखंडाचा कॅरॅबिनर साधारणता 23KN क्षमतेचा असतो.
*1KN=101.972 kgf
८)स्लिंग

९)स्नॅप स्लिंग

१०)हेल्मेट

११)बिले प्लेट

१२)डिसेंडर

*तुम्हाला रोपच्या काही गाठी(नॉट) मारता यायला हव्यात.

“थंब नॉट,रिफ व फिशरमन नॉट,फिगर ऑफ एट, बो लाईन” इत्यादी नावांनी या नॉट ओळखल्या जातात.याचे कौशल्य अत्मसात करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक व सरावाची गरज असते.
*कातळारोहणाची पद्धत-

सर्व प्रथम यासाठी तुमच्याकडे एक कसलेली व जिवाला जिव देणारी एक टिम असायला हवी. ज्यात सपोर्ट टिम,लिड टिम वगैरे प्रभाग करत सुसज्ज करायला हवी.जो सुळका अथवा कातळ अरोहण करायचा आहे. त्याची रेकी व पुरेपूर अभ्यास करुन.

मग, एखाद्या दिवशी वरील सर्व साहित्य एका मजबूस हावर सॅक मध्ये एकमेकांना वाटून भरुन घ्याव.सुरक्षित त्या ठिकाणावर पोहचाव.
*आता प्रत्यक्ष अरोहण कसे करतात ते पाहू.

अरोहणासाठी तीन सदस्यांच्या टिमची अवश्यकता असते.पहिला जो लिडर असतो व बाकीचे बिले देत असतात.लिडर हरनेस,पिटॉन,बोल्ट,  पिटॉन हॅमर,कॅरॅबिनर,डिसेंडर, पाणि बॉटल इ. साहित्य कमरेला अडकवून व दोर कमरेस घट्ट बांधून अरोहणास  प्रारंभ करतो.जो पर्यंत फ्री क्लाईंबिंग करता येते तोपर्यंत करतो व कठीण श्रेणीचा कातळ.म्हणजे,  विना खाच खळग्याची एक सपाट नैसर्गिक भिंत लागली की,त्यात तिथेच जागा पाहून पिटॉन किंवा  बोल्ट हातोडीच्या सहाय्याने ठोकतो.

आता यात नविन तंत्रद्नानाची भर पडली आहे. कार्बन फायबरचे बोल्ट वापरले जातात.ते ठोकण्यासाठी छोट्या ड्रील मशिनच्या सहाय्याने होल केले जाते.त्यात केमिकलच्या कांड्या टाकून बोल्ट ठोकला जातो. बोल्टच्या दबावाने त्या केमिकल कांड्या आतच फुटतात व ते केमिकल कातळ व बोल्ट यांचा असा काहि जोड निर्माण करते की, पुढील ५० वर्षे तरी  हा जोड कायम राहतो व केमिकल काहि क्षणातच आपले काम फत्ते करते.मग, त्या बोल्टच्या आधारे लिडर वर जातो. एखाद्या टप्प्यावर सेफ होतो.जागा नसेल तर त्या ठोकलेल्या बोल्टलाच कॅरॅबिनरच्या सहाय्याने एक शिडी अडकवतो व त्याच्या आधाराने वरचा बोल्ट ठोकतो.लिडरच्या कमरेला बांधलेला रोप कॅरॅबिनेरच्या सहाय्याने त्या बोल्ट मध्ये अडकवत वर वर जातो.

अशावेळी लिडर पुर्णता असुरक्षित असतो.

तो जितका वर गेला आहे तितक खाली येऊ नये म्हणून,तो ‘रनिंग बिले’ घेत पुढे सरकतो. म्हणजे,लिडर प्रत्येकी दोन मिटर अंतरावर पिटॉन ठोकून किंवा चोक अडकवून त्यात कॅरॅबिनर अडकवून त्यातून रोप ओवून वर जातो.म्हणजे, जरी त्याचा तोल गेला व तो पडला तरी त्याला डबल बिले मिळतो. एक सह्यमित्र अरोहकाने दिलेला व दुसरा ठोकलेला पिटॉन त्याला आधार देतो. त्याला खाली पडू देत नाही.

असे ठराविक अंतर पार केला कि,तो स्वत:स अँकर करतो.(म्हणजे सुरक्षित टप्प्यावर तो स्वत:त सेफ करतो)  व मग दुसर्या अरोहकास बिले देत रोपच्या सहाय्याने वरच्या टप्प्यावर घेतो.आणखी टप्पा झाला की तो दुसरा तिसर्याला बिले देत वर घेतो.हा क्रम कातळ अरोहण पुर्ण होई पर्यंत चालू असते.कधी कधी अति उत्साहि अरोहक लिडरचे न ऐकता आपला कॅरॅबिनर सांगूनहि रोप मध्ये अडकवत नाहित. अर्थात ते पुर्ण अनसेफ असतात व खाली पडून इजा होण्याची शक्यता बळावते.तेव्हा, लिडरच्या सुचनांचे पालन केले पाहिजे.

आता कडा पुर्ण अरोहण झाल्या नंतर उतरण्यासाठी रॅपेलिंग  (दोरीच्या सहाय्याने सरपटत खाली येणे.) याचे दोन प्रकार पडतात.

१)रॅपेलिंग –

या प्रकारात तुम्हाला दोर कड्याच्या वरच्या टोकाला मजबूत अँकर करायचा असतो.तुमच्या हरनेसला सोबत आणलेला डिसेंडर कॅरॅबिनरच्या सहाय्याने जोडायचा असतो व रोपच्या सहाय्याने खाली यायचे असते.

डिसेंडरचे दोन तीन प्रकार आहेत.

१)पुर्वी चैन पुल्ली सारख्या दिसणार्या एका उपकरणात दोर कायमचा अडकवून ठेवत व त्याचा उपयोग करत पण हि पद्धत फार किचकट व वेळ खाऊ असते.मात्र जास्तवेळ त्याच ठिकाणावर थांबायचे असल्यास हि पद्धत वापरता येते.इंडस्ट्रियल लाईन मध्ये रंगकाम किंवा अध्यंतरी करण्यात येणार्या कामांसाठी याचा उपयोग होत होता.

२)फिगर ऑफ एट मेन्यूअल डिसेंडर-

हा एक आठाच्या आकाराचा बनवलेला अजोड प्रकारचा असतो.यात रोपचा वापर कसा करायचा याच मात्र तंत्रद्नान तुम्हाला प्रत्यक्षरित्याच घ्यावे लागेल.यात खालच्या बाजूस ‘फायरमन बिले’ घेता येतो. म्हणजे जरी तुमचा हात निसटला तुम्ही स्विंग झालात.ओव्हरहँगला सपोर्ट मिळाला नाहि किंवा अन्य कारणे.

तरी, खालचा बिले मन तुम्हाला कंट्रोल करतो.याचा वापर बिले देण्यासाठीही होतो.म्हणजे,एखाद्या टप्प्यावर तुम्ही डाऊन क्लाइंबिंग करत आहात व टप्पा मोठा असेल तर, जास्तिची दोरी तुमच्या हरनेसला जोडून ती या फिगर ऐट डिसेंडर मधून ओवून घेतली जाते.यामुळे, तुम्हाला बिले देणार्या अरोहकावर ताण पडत नाही.तो तुम्हास आरामात खाली उतरवू शकतो.

३)अॅटो डिसेंडर-

हे आता आता नविन आलेले उपकरण आहे. यात रोप सेट केला जातो.या उपकरणास एक कंट्रोल लिवर असतो.जेव्हा, हा लिव्हर तुम्ही ऑपरेट कराल तेव्हाच हे उपकरण प्ले होते.अन्यथा ते तुम्हास आहे त्याच जागेवर स्थिर ठेवतो.
२)कमांडो रॅपेलिंग-

साध्या रॅपेलिंग मध्ये आपले तोंड हे कड्याच्या दिशेने वर असते.तर,  या प्रकारात तोंड खाली जमिनिच्या दिशेने असते.मात्र हा प्रकार जास्त रिस्की आहे.अत्यंत सराव व मार्गदर्शनाने हि कला शिकता येते.
रॅपेलिंग हे तंत्रद्नान जरी थरारक अनुभूती देत असले तरी, पुर्णत: रोप,डिसेंडर, कॅरॅबिनर,अँकर यांवर अवलंबून असावे लागते. त्यामुळे,एक वेगळा रोप हरनेसला लावून तो वरच्या लिडरच्या हातात असला म्हणजेच सेप्टी कंट्रोल बिले हितावह ठरतो.
______सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी अरोहण करणार आहोत. तेथील प्राणिमात्रांची,तेथील माणसांचा माणसांचा आपण सन्मान केला पाहिजे.कातळारोहणाचे कोणतेही तंत्र शिकताना सक्षम शरीर एकाग्र मन व संयम तसेच योग्य नियोजन व जिद्द याच्या बळावर कातळारोहणाचे हे तंत्रहि सहज अात्मसात करता येण्याजोगे आहे.

यातही काही गोष्टी आहेत ज्या फक्त अनुभवातूनच आत्मसात करता येतात. डोंगरयात्रेत चालढकल किंवा ढिलाई खपवली जाते. या प्रकारात असे काहि चालत नाही. असे केल्यास एकतर गंभिर दुखापतीला सामोर जाव लागत किंवा कधी कधी प्राणालाही मुकाव लागते.

यात आपण वापरत असलेली साधने वेळो वेळी तपासायला हवीत.त्यांची निगा राखणे महत्वाचे असते.योग्य कंपनीची निवड.त्याचे द्नान असणे अवश्यक असते.

मी वर दिलेली माहिती हि प्राथमिक स्वरुपातील आहे.यात खुप काही बाबी राहून गेल्यात.त्या वाचून नाहि तर अनुभवातून शिकाव्या लागतात.

______अरोहणाचा आणखी प्रकार आहे. तो म्हणजे,

*हिम पर्वत यात्रा व हिम बर्फारोहण

परंतू,
“भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा

गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा,

तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी,

प्यार मला हे कभिन्न कातळ ,प्यार मला छाती  निधडी,

मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला”
म्हणून थांबतो…

(चुक भूल देणे घेणे.जाणकारांनी आणखी मार्गदर्शन करावे हि आपेक्षा)
धन्यवाद…
विशेष आभार

राहुलराव साबळे
लेखन-

नवनाथ आहेर

(९९२२९७३१०१)

बा रायगड परिवार महा. रजि.